चण्याचा आरोग्याला इतका फायदा होतो की शरीरातील प्रत्येक अवयव चांगले ठेवण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे वरदानापेक्षा कमी नाही. चण्यामध्ये आढळणारा स्टार्च हळूहळू पचतो आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवतो. चणे खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका कमी होतो. चण्यामध्ये प्रथिने आणि फायबर आढळतात, जे रक्तातील साखरेची पातळी राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुम्ही लठ्ठपणा किंवा वाढत्या वजनामुळे त्रस्त असाल तर चणे तुमची मदत करू शकतात. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.