केसांमध्ये कोंडा म्हणजेच डँड्रफ होणे ही एक सामान्य समस्या आहे.

या समस्येला सामोरे जाण्यासाठी विविध प्रकारच्या टिप्स आणि पद्धतींचा अवलंब केला जाऊ शकतो.

कोंडा दूर करण्यासाठी खोबरेल तेल सर्वोत्तम आहे.त्यात व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात असते.या तेलात लिंबाचा रस घालू शकता.

एक चमचा दही केसांना लावा आणि एक तास ठेवा आणि मग डोके धुवा.

केसांत कोंडा होत असेल तर तुळस आणि आवळा पावडर एकत्र करून अर्धा तास डोक्याला लावा.यानंतर हर्बल शैम्पूने धुवा.

लिंबू हे व्हिटॅमिन सी, ए, बी, फॉस्फरस आणि अँटी-ऑक्सीडेंटचा स्रोत आहे. लिंबू आपले केस दाट आणि चमकदार बनवू शकते

तुळस आणि आवळ्याची पेस्ट बनवून आपण केसांना मसाज करू शकता.मसाजनंतर अर्ध्या तासानंतर केस धुवा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.

यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.