असे म्हटले जाते की, आपल्या आयुष्यात स्वप्नांचे खूप महत्व असते. स्वप्न बघण्याची वेळ ते खरे होण्यासाठी खूप मत्त्वपूर्ण असते. दिवसाची स्वप्ने ही विकृत मनाचे दृष्टान्त असतात, त्यांना काही महत्त्व नसते. शास्त्रानुसार रात्री 10 ते 12 दरम्यान पाहिलेली स्वप्न खरी होत नाहीत. हा फक्त दिवसभरातील घटनांचा मेंदूवर परिणाम होत असतो. रात्री 12 ते 3 या वेळेत पाहिलेली स्वप्न खरी होण्याची शक्यता असते. ही स्वप्न खरी होण्यासाठी वर्ष देखील लागू शकते. ब्रह्म मुहूर्तावर पाहिलेल्या स्वप्नाचे खूप महत्व असल्याचे सांगितले जाते. सकाळी 3 ते 5 या वेळेत पाहिलेली बहुतेक स्वप्न ही खरी होण्याची शक्यता असते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.