किवी हे फळ आरोग्याचा उत्तम खजिना मानला जातो.

या फळामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे आढळतात.

दररोज एक किवी खाल्ल्याने अनेक फायदे मिळू शकतात.डोळ्यांसाठीही हे एक अत्यंत महत्त्वाचे फळ मानले जाते.



किवी हे असे एक फळ आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळते.



याशिवाय किवीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सही आढळतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच शरीराला अनेक आजारांशी लढण्याची ताकद देते.



हे रोज खाल्ल्याने अस्थमा सारख्या आजारांपासून बऱ्याच अंशी आराम मिळतो.

किवी हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप चांगले फळ मानले जाते.



आरोग्य तज्ञांच्या मते, या फळामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे,ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.