हिवाळ्यात डाळिंब खाल्ल्याने मौसमी आजारांपासून संरक्षण होते आणि शरीर निरोगी राहते.

यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते,जे खोकला,सर्दी यासारख्या हिवाळ्याच्या संसर्गापासून संरक्षण करते.

डाळिंबामध्ये भरपूर पोषक तत्व आढळतात,जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात.

डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, फायबर, फोलेट, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी आढळतात.

याच्या सेवनाने पचनसंस्थेशी संबंधित समस्या दूर होतात आणि रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते.

हिवाळ्यात याच्या सेवनाने शरीरातील अशक्तपणा दूर होतो आणि शरीरातील हिमोग्लोबिनही वाढते.

डाळिंबात अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आढळतात, जे शरीरातील पेशींना फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात.

हिवाळ्यात हृदय निरोगी ठेवण्यासाठी डाळिंबाचे सेवन केले जाऊ शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.