सर्दी किंवा खोकल्यावर शिंका येणे खूप सामान्य आहे,अनेकांना खूप शिंक येते.

अनेकदा एका शिंकानंतर लगेच दुसरी शिंक येते.

अशा परिस्थितीत बरेच लोक शिंकण्यापासून स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करतात.

शिंकणे थांबवणे धोकादायक का असू शकते.

जेव्हा आपण खोकलतो किंवा शिंकतो तेव्हा शरीरावर दबाव येतो.त्यामुळे फुफ्फुसांवरही दबाव येतो.

अशा परिस्थितीत एखाद्याला शिंका येणे थांबवले तर हा दाब १० पटीने वाढतो.

अशा स्थितीत शरीराच्या कमकुवत भागांवर दाब पडल्याने जखमा होऊ शकतात.

याचा परिणाम कान आणि डोळ्यांवरही होऊ शकतो.

म्हणूनच प्रत्येक वेळी शिंकणे किंवा खोकला थांबवणे धोकादायक ठरू शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही