पोहे पचनासाठी हलके असतात.

पोह्यांचे सेवन केल्याने आतड्यांचे आरोग्य नियंत्रित राहण्यास मदत होते.

तसेच दह्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

पोह्यामध्ये कर्बोदके असल्याने ते शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात.

तसेच दही शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते.

दही-पोहे खाल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

पोह्यात लोह असल्याने हे अशक्तपणावर मत करण्यास मदत करते.

तसेच दही-पोहे खाल्याने जळजळीचा त्रास कमी होतो.

सांधे दुखीवर देखील दही फायदेशीर मानले जाते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.