आल्यामध्ये सोडियम,अँटी-ऑक्सिडंट,पोटॅशियम,व्हिटॅमिन बी,झिंक आणि मॅग्नेशियम सारखे गुणधर्म आढळतात,

जे हिवाळ्याच्या काळात अनेक आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

हिवाळ्यात आल्याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

आले हे आयुर्वेदात खूप फायदेशीर मानले जाते.हिवाळ्यात आल्याचे सेवन केल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.

यासाठी आल्याचा चहा पिणे फायदेशीर मानले जाते.यामुळे शरीर संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करू शकते.

हिवाळ्यात आहारात बदल होतो,त्यामुळे बद्धकोष्ठता,अपचन,अशा समस्यांनी लोक हैराण झाल्याचे पाहायला मिळते.

अशा परिस्थितीत आल्याचे सेवन केल्यास या समस्यांपासून सुटका मिळू शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही