कढीपत्त्यात अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे टाळूतील कोंडा काढून टाकण्यास मदत करतात.
कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन बी आणि प्रथिने यांसारखी गुणधर्म असतात. स्प्लिट एंड्सची समस्या कमी करण्याचे कामदेखील कढीपत्ता करतं.
कढीपत्त्यातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म कोरड्या केसांच्या उपचारात मदत करतात आणि केसांना आवश्यक चमक आणि जिवंतपणा देतात.
तुम्ही अधिक चमक मिळविण्यासाठी, नारळ आणि कढीपत्ता सीरम लावू शकता.
केसांच्या मजबुतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अमीनो ऍसिडचा समृद्ध स्रोत म्हणून, कढीपत्ता केसांच्या पट्ट्यांना चमक देतात.
कढीपत्ता आणि कांद्याचा रस केसगळती नियंत्रित करण्यासाठी आश्चर्यकारक काम करू शकतात.
10 ते 15 ताजा कढीपत्ता घ्या आणि त्यांची गुळगुळीत पेस्ट बनवा. पेस्टमध्ये कांद्याचा रस घाला आणि केसांना लावा. त्यानंतर केस शॅम्पूने धुवा.
केस अकाली पांढरे होणे कमी करण्यासाठी तुम्ही कांद्याचा रस आणि कढीपत्ता हेअर मास्क देखील वापरू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.