अलिकडच्या काळात महिलांमध्ये प्रसूतीनंतर डिप्रेशनची समस्या वाढताना दिसत आहे. याची लक्षणं कशी ओळखाल जाणून घ्या.
घरात छोटा नवीन पाहुणा आल्यावर घरातील वातावरण फारच आल्हाददायक होऊन जातं.
नव्या पाहुण्याच्या स्वागतात सगळे गुंतलेले असतात आणि बाळाच्या आईकडे काहीसं दुर्लक्ष होतं. प्रसूती झालेल्या महिलेच्या शारीरिक आरोग्यसोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे.
प्रसूतीनंतर म्हणजेच बाळाचा जन्म झाल्यानंतर महिलांमध्ये अनेक शारिरीक आणि मानसिक बदल होतात. शारीरिक बदलांमुळे महिलेची मानसिक स्थिती खालावते. यामुळे नैराश्य येते, यालाच 'पोस्टपार्टम डिप्रेशन' म्हणजेच प्रसूतीपश्चात नैराश्य असं म्हणतात.
प्रसूतीनंतर महिलांचं मानसिक आरोग्य खालावतं, त्यामुळे अशा वेळी त्यांनी अधिक समजून घेण्याची आणि त्यांची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असते.
मूड स्विंग, मन उदास वाटणे, कोणाशीही बोलायची इच्छा नसणे, चिडचिड वाढणे, रडावसं वाटणे, एखाद्या कोपऱ्यात एकट बसण्याची इच्छा होणं ही पोस्टपार्टम डिप्रेशनची सुरुवातीचं लक्षणं आहेत.
डॉक्टरांच्या मते प्रत्येक स्त्रीला प्रसूतीपश्चात नैराश्याची समस्या उद्भवत नाही. सुमारे 70 टक्के महिलांना पोस्टपर्टम डिप्रेशनचा समस्येचा सामना करावा लागतो.
प्रसूतीपश्चात नैराश्याचे परिणाम एक ते दोन महिने टिकतात. त्यानंतर ही समस्या दूर होते.
पण जर ही समस्या दूर झाली नाही आणि याकडे दुर्लक्ष केले गेले तर परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि समस्या अधिक गंभीर होऊ शकते.
परिस्थिती गंभीर असेल तर तुम्ही डॉक्टरांची मदत घेऊ शकता.