ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. ताकाच्या सेवनाने शरीरातील चरबी देखील कमी होते.



ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.



तोंडात फोडी येत असल्यास ताकाने गुळण्या करव्यात. आराम मिळेल.



ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी मार्गात होणारी जळजळ बंद होते.



जायफळ पूड ताकात मिसळून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.



रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखीत देखील आराम मिळतो.



पित्ताचा त्रास होत असल्यास ताकात साखर आणि काळी मिरी मिसळून प्यावे.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.