एकीकडे देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका असल्याची शक्यता वर्तवली जात असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे



देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली असून मृत्यू घटले आहेत



देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे नवे 2 हजार 288 रुग्णांची नोंद झाली असून 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे



आधीच्या दिवसाच्या तुलनेत ही मोठी घट आहे. 919 रुग्णांची घट झाली आहे.



आदल्या दिवशी 3207 कोरोनाबाधितांची नोंद आणि 29 जणांचा मृत्यू झाला होता



देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.74 टक्के आहे



देशात एकुण 4 कोटी 25 लाख 63 हजार 949 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे



देशात आतापर्यंत कोरोना कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4 कोटी 31 लाख 7 हजार 689 झाली आहे



सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 637 इतकी झाली आहे



गेल्या 24 तासांत 10 कोरोनाबळींसह कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची एकुण संख्या 5 लाख 24 हजार 103 वर पोहोचली आहे