अभिनेत्री आलिया भटने नुकतीच कतारमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती यावेळी आलिया भटचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला आहे आलिया भट यावेळी पांढच्या शुभ्र ब्लेझरमध्ये दिसली या खास डिझायनर ब्लेझरमध्ये आलिया फार सुंदर दिसत होती या ब्लेझरच्या कोटला केपची जोड होती यामुळे आलियाच्या या लूकला रॉयल टच मिळाला या ब्लेझरसह आलियाने हिरव्या आणि पांढरा असा रंग असणारा डायमंट सेट घातला होता पोनी हेअरस्टाईल आणि लाईट मेकअपमुळे हा लूक खुलून दिसत होता आलिया भट्ट 14 एप्रिल 2022 रोजी रणबीर कपूरसोबत लग्नबंधनात अडकली अलिकडेच आलिया भट्टचं नाव टॉप-5 चित्रपटसृष्टीतील इनफ्लुएन्सर्सच्या यादीत सामिल झाले आहे