ब्रोकोली ही एक हिरवी भाजी आहे जी दिसायला साधारण फ्लॉवर सारखी दिसते.



ब्रोकोली हे जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स आणि अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध पोषक तत्वांचा खजिना आहे.



ब्रोकोलीची भाजी कच्ची किंवा त्याची भाजी बनवून खाता येते.



सलादमध्येसुद्धा ब्रोकोलीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.



ब्रोकोलीमध्ये कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. हाडांच्या आरोग्यासाठी आणि ऑस्टिओपोरोसिस रोखण्यासाठी ब्रोकोली फायदेशीर ठरते.



ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन के, एमिनो अॅसिड आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते. हे सर्व निरोगी त्वचेच्या प्रतिकारशक्तीमध्ये योगदान देतात.



ब्रोकोलीमध्ये बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असतात यामुळे तुमची दृष्टीसुद्धा चांगली राहते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.