गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 1,549 नवीन रुग्ण आढळले असून 31जणांचा मृत्यू झाला आहे
देशातील कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 4 कोटा 30 लाख 9 हजार 390 वर पोहोचली आहे
सध्या देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 25,106 वर गेली आहेत
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5 लाख 16 हजार 510 झाली आहे
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 181 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत
रविवारी दिवसभरात 2 लाख 97 हजार 285 डोस देण्यात आले
आतापर्यंत 181 कोटी 24 लाख 97 हजार 303 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत
आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दोन कोटींहून अधिक कोराना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत