अभिनेत्री दिव्या भारतीचे कमी वयात निधन झाले. दिव्या भारतीचे निधन झाले तेव्हा तिचे स्टारडम सर्वोच्च स्थानावर होते. दिव्या भारतीच्या निधनामुळे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण अडकले होते. 'मोहरा' हा असाच एक चित्रपट होता. 'मोहरा' चित्रपटाचे पाच दिवस शूटिंगही दिव्याने केले होते. पण पाच दिवसांनीच तिचा मृत्यू झाला आणि नंतर तिच्या जागी रवीना टंडनने ही भूमिका साकारली. दिव्या भारती 'कर्तव्य' चित्रपटाचादेखील एक भाग होती आणि त्याचे बरेचसे शूटिंग देखील पूर्ण झाले होते. मात्र तिच्या मृत्यूनंतर जुही चावलाने ही भूमिका साकारली श्रीदेवीने 'लाडला' या चित्रपटात तिची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. पण आधी ही भूमिका दिव्या भारतीच करणार होती. दिव्याने या चित्रपटाचे बरेच शूटिंग देखील पूर्ण केले होते. मात्र तिच्या निधनानंतर श्रीदेवीने ही भूमिका साकारली. ऋषी कपूर यांनी 2020 मध्ये जगाचा निरोप घेतला. त्यावेळी त्यांनी 'शर्माजी नमकीन'चे शूटिंग बर्याच प्रमाणात पूर्ण केले होते. त्यावेळी परेश रावल यांनी त्यांच्या उर्वरित भागाचे चित्रीकरण केले