रोज रात्री ७ ते ८ बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावेत. रोज गाजर खाल्ल्यास किंवा त्याचा ज्युस पिल्यास नजर तीक्ष्ण होते. रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याने डोळे धुवावेत. रात्री झोपण्याआधी मोहरीच्या तेलाने पायांना मालिश करावी. बडिशेप, बदाम, साखर एकत्र करुन वाटून, झोपताना हे वाटण दुधासोबत प्या. ३ ते ४ वेलची आणि बडिशेप वाटून घ्या, हे वाटण रोज झोपताना दुधासोबत प्या. ग्रीन-टी दिवसातून २ ते ३ वेळा प्या,यामध्ये असलेले अॅन्टीऑक्सिडेंट्स डोळ्यांना फायदेशीर ठरतात. दिवसातून दोन वेळा आवळ्याचा मुरंबा खाल्ल्याने नजर चांगली होते. डोळ्यांच्या अवतीभवती अक्रोडच्या तेलाने मालिश करावी. रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या खाव्यात.