मधुमेह रुग्णांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे फार गरजेचे आहे. या आजारात खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी न घेतल्याने रुग्णाच्या समस्या आणखी वाढतात. अशातच बरेच रूग्ण अनेकदा काय सेवन करावे आणि काय टाळावे याबद्दल संभ्रमात राहतात. कांद्याचे सेवन मधुमेह रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असल्याने शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. कांद्यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे,आयुर्वेदात औषध म्हणूनही त्याचा वापर केला जातो. कांद्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर आणि व्हिटॅमिन सी यांसारखे शरीरासाठी फायदेशीर घटक पुरेशा प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी कांदा खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर कांदा हे शरीराची ऊर्जा वाढवण्याचं काम करतं. टीप : या सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने.