डाळीचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण जर आपण मूग डाळीबद्दल बोललो तर ती इतर डाळींपेक्षा जास्त फायदेशीर मानली जाते. मूग डाळीमध्ये भरपूर पोषक तत्व असतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रात्रभर भिजवलेली मूग डाळ सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. भिजवलेली मूग डाळ सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते. मूग डाळीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते, जे पचन सुधारण्यास मदत करते. भिजवलेली मूग डाळ सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास अशक्तपणा दूर होतो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही भिजवलेली मूग डाळ सकाळी रिकाम्या पोटी खावी. टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.