जसजसा हिवाळा जवळ येतो तसतसा ताज्या आणि सुवासिक मेथीच्या पानांचा सुगंध स्वयंपाकघरात येतो.

हिवाळ्यात बनवलेल्या अनेक पदार्थांपैकी एक म्हणजे मेथी पराठा.

मेथी पराठा हे सहसा कोशिंबीर,रायता किंवा चटण्यांसोबत त्याचा आस्वाद घेतला जातो.

मेथी पराठा आपलं वजन कमी करण्यास देखील मदत करू शकते.

मेथीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली निरोगी राहतात.

मेथीपासून बनवलेले पदार्थ खाल्लानं तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी चांगली राहते.





तसेच रक्तदाब नियंत्रणात राहून शरीर निरोगी राहतं.

मेथी खाल्ल्यानं पुरुषांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनच्या निर्मितीचं प्रमाण वाढतं.

मेथी खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे हिवाळ्यातील सकाळी नाश्त्यामध्ये गरमागरम मेथी पराठे खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.