मध्यम प्रमाणात वाइन पिणे तुमच्या हृदयासाठी चांगले असू शकते. हार्वर्ड टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार,रेड वाईन पांढर्या वाइनपेक्षा आरोग्यदायी असल्याच सांगीतल जातं रेड वाईनला अनेक अँटिऑक्सिडंट असतात जे हृदयाचे आरोग्य आणि चांगले कोलेस्ट्रॉल पातळी वाढवतात. यामुळे खराब कोलेस्ट्रॉल पातळीचा धोका कमी होतो. एका संशोधनात असं म्हटलं आहे की, रेड वाईनचे कमी प्रमाणात सेवन केल्याने कर्करोगचा धोका कमी होतो. दररोज दोन ग्लास वाईन प्यायल्याने दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगता येतं असं म्हटलं जातं. रेड वाईनमधील पॉलिफेनॉल पांढर्या वाईनपेक्षा जास्त असू शकतात. पण, तरीही ते डार्क चॉकलेट किंवा ब्लू बेरीमधील इतर संयुगांपेक्षा कमी आहेत. यामुळे पांढऱ्या वाईनमध्ये अँटिऑक्सिडंटची कमतरता असते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.