कोरफडमुळे त्वचा तर सुंदर दिसतेच पण त्याचबरोबर आरोग्याचे देखील अनेक फायदे मिळतात.



कोरफडमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीवायरल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत.



एलोवेरा जेलने केवळ तोंडाच्या अल्सरवर उपचार करता येत नाहीत तर अल्सरचा त्रासही कमी होतो.



अँटी-व्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांव्यतिरिक्त, कोरफडमध्ये अमीनो अॅसिड आणि बी1, बी2, बी6 आणि सी जीवनसत्त्वे असतात जे त्वचेसाठी फायदेशीर असतात.



वजन कमी करण्यासाठी सुद्धा कोरफडीचा वापर केला जातो. जेवणाआधी कोरफडीच्या रसाचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.



कोरफडमध्ये व्हिटॅमिन बी असल्यामुळे शरीरातील चरबीचे उर्जेमध्ये रूपांतर होते आणि वजन कमी करण्यास मदत होते.



दररोज एक चमचा कोरफडीचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत होते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.