थंडीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.

थंडीचे आगमन होताच अनेकांना आजारांना सामोरे जावे लागते.

उष्ण प्रकृतीच्या गोष्टींचे सेवन थंड वातावरणात फायदेशीर ठरते.

हिवाळ्यात लवंगाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

याचे सेवन केल्याने आपले शरीर उबदार राहते. आणि लवंगातील सर्व पोषक तत्वांचा लाभही आपल्याला मिळतो.

काळी मिरी एक तिखट आणि कडू चव आहे.हा एक असा मसाला आहे ज्याचा वापर हिवाळ्यात खूप फायदेशीर आहे.

काळी मिरी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी,खोकल्यांपासूनआराम मिळतो.

दालचिनीचा उबदार प्रभाव शरीराला आतून उबदार ठेवतो,ज्यामुळे हिवाळ्याच्या थंडीपासून आराम मिळतो.

हे आपली प्रतिकारशक्ती वाढवते आणि त्वचेच्या संसर्गासारख्या समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.