दरवर्षी दिवाळीत फटाके फोडताना जळण्याच्या अनेक घटना घडतात.



या संदर्भात आरोग्य तज्ज्ञ सांगतात की,



फटाके फोडताना डोळ्यांना काही त्रास होत असेल तर घरीच उपचार करणे टाळा.



तसेच कोणाच्याही सल्ल्याशिवाय डोळ्यांत ट्यूब किंवा कोोणत्याही औषधाचा थेंब टाकू नका.



जर फटाके फोडताना चुकून तुमच्या डोळ्यांत फटाक्याची ठिणगी गेली तर सर्वात आधी डोळे स्वच्छ पाण्याने धुवा



आणि त्यानंतर लगेच डोळ्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.



फटाके फोडताना जर तुमच्या डोळ्यांत ठिणगी पडली तर डोळे चोळण्याची चूक करू नका.



मुलांचे हात पूर्णपणे स्वच्छ करायला विसरू नका, हातांनी डोळ्यांना स्पर्श केल्यास जळजळ, खाज आणि लालसरपणा होऊ शकतो



फटाके फोडतांना चष्मा लावा,यामुळे फटाक्यांच्या धुरापासून आणि त्यातून निघणाऱ्या ठिणग्यांपासून तुमचे डोळे सुरक्षित राहतील.



हातात फटाके फोडण्याची चूक अजिबात करू नका.



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.