भोपळ्याच्या बियांमध्ये फॅटी अॅसिडस्, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, अत्यावश्यक अमीनो अॅसिड आणि फिनोलिक संयुगे असतात. या बियांचे सेवन केल्याने मधुमेह, हृदयरोग, स्नायू/हाडे दुखणे, केस गळणे आणि मुरुमांवर नियंत्रण मिळवता येते. भोपळ्याच्या बिया आणि त्यांचे तेल त्वचेसाठी फायदेशीर आहे. बियांमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि सी कोलेजनचे उत्पादन वाढवतात. कोलेजन जखम भरण्यास मदत करते. हे तुमची त्वचा तरुण आणि उजळ ठेवण्यास मदत करते. या बियांमध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड चांगल्या प्रमाणात असतात. भोपळ्याच्या बियांमध्ये जस्त भरपूर असते. त्यामुळे केसगळती कमी होते. बियांमधील औषधी गुणधर्म शरीरातील बॅक्टेरिया आणि व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत करतात. प्रत्येक दिवशी दोन ते तीन चमचे भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळू शकते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.