सकाळी उठल्यावर अनेकांना चहा पिण्याची सवय असते. परंतु जास्त चहा प्यायल्याने तब्येत खराब होऊ शकते. कमी प्रमाणात चहा प्यायल्यास फ्रेश वाटतं. चहामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. चहा पिणे सोडाल तर तुमच्या शरीरात चांगले बदल होऊ शकतात. तुम्हाला झोप चांगली येऊ शकते. तुमचे दात स्वच्छ राहतील. तुमच्या मुखातून दुर्गंधी येणार नाही. पचनक्रियेत अडथळा येणार नाही.