आहारामध्ये मर्यादित स्वरुपात कडधान्यांचा समावेश केल्यास आरोग्यास फायदा होईल. मटकी देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. मटकीमध्ये पोषक घटक पुरेशा प्रमाणात असतात. मटकीमध्ये पुरेशा प्रमाणात कॅल्शिअम देखील असते. हाडे मजबूत होण्यासाठी फायदा होतो. मटकीमध्ये झिंकचेही प्रमाण अधिक असल्याने शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते. मटकीमध्ये आढळणारे झिंक शरीरासाठी अँटी-ऑक्सिडंट प्रमाणे कार्य करते आणि ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस नियंत्रणात ठेवते. मटकीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. वजन कमी करण्यासाठी मटकीचे सेवन करणं उत्तम पर्याय ठरू शकतो. मटकीच्या सेवनामुळे शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळते. मटकी सारख्या कडधान्यामुळे शरीराची चयापचयाची क्षमता देखील सुधारते. मटकीमधील व्हिटॅमिन बी मुळे आपल्या शरीरातील ऊर्जेची पातळी वाढण्यास मदत मिळते. सूचना: आहारामध्ये कोणतेही बदल करण्यापूर्वी आहारतज्ज्ञांचा, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.