गवारीमधील फायबर हे कोलेस्ट्रॉलचा स्तर संतुलित ठेवते.
गवारी पाण्यामध्ये उकळून हे पाणी दमा असलेल्या रुग्णाला दिल्यास आरोग्यास मदत होते.
गवारीच्या शेंगामधील बिया रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवून त्या बारीक करून सूज, भाजलेल्या ठिकाणी लावल्यास आराम मिळतो.
गवारीच्या पानांचा रस डाग, खाज असेल या ठिकाणी लावावा.
दररोज गवारच्या भाजीचे सेवन केल्यामुळे डोळ्यांची शक्ती वाढते.
गवारीमध्ये प्रोटीन,फायबर, कार्बोहाइड्रेट्स, व्हिटॅमिन, कॅल्शियमची तत्वे आहेत.
डायबिटीज रुग्णांनी कच्ची गवार खाल्ल्यास आरोग्यास फायदा होतो.
यातील कॅल्शियम, लोह तत्व आणि पोटॅशियममुळे हाडे मजबूत होतात.
गवारची भाजी हृदय रुग्णांसाठी उत्तम आहे.
शारीरिक कमजोरी असल्यास गवार दररोज खावी.
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.