उवर्शीच्या सौंदर्याला 'गोल्डन ड्रेस'ची चकाकी

अभिनेत्री आणि मिस युनिवर्स उवर्शी रौतेलाच्या सौंदर्याने साऱ्यांनाच भुरळ घातली आहे.

तिने तिच्या सौंदर्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची शान वाढवली आहे. उर्वशी नुकतीच अरब फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती.

अरब फॅशन वीकमध्ये दोनदा उपस्थिती लावणारी पहिली भारतीय ठरली आहे.

या फॅशन वीकमध्ये उर्वशी तिच्या गाऊनमुळे अधिकच चर्चेत आली आणि त्याच कारण म्हणजे त्याची किंमत 40 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

अरब फॅशन वीकमध्ये उर्वशी रौतेलाने दुबईस्थित लक्झरी फॅशन डिझायनर फर्ने वन अमांटोने डिझाइन केलेला गोल्डन हाय-थाई स्लिट गाऊन परिधान केला होता.

अमांटोने उर्वशीच्या आधी बेयॉन्से आणि जेनिफर लोपेझ सारख्या सुंदरींसाठीही देखील कपडे डिझाइन केले आहेत.

उर्वशीचा हा ड्रेस बनवताना, शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे.