सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात डॉग अँड कॅट शोचे आयोजन करण्यात आले होते.

या डॉग शोमध्ये सोलापूरसह, विजापूर, लातूर, कलबुर्गी, लातूर, सांगली, पुणे इत्यादी जिल्ह्यातून

सुमारे 80 हून अधिक विविध प्रजातीचे श्वान सहभागी झाले होते.

जर्मन शेफर्ड, लॅब्राडोर, डॉबरमन, पिटबुल, पॉमेरियन,

गोल्डन, रेट्रीवर, शिबू आदी विविध जातींच्या श्वानांनी

या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला.

तर कॅट शोमध्ये परशियन, बंगाल कैट, क्लासिक, एक्झोटीक लॉग वेअर आदी जातीचे मांजर सहभागी झाले होते.

डॉग शो नंतर डॉग फॅशन शो देखील पार पडले.

यास्पर्धेत सहभागी स्पर्धाकांनी रंगबेरंगी कपड्यांमध्ये आपल्या श्वानांना सजवले होते.

डॉग शो आणि कॅट शो पाहण्यासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती.