चांद्रयान-3 ने यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. इस्रोने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ISRO ने माहिती दिली की, चांद्रयान-3 चे पुढील ऑपरेशन 6 ऑगस्ट 2023 रोजी सुमारे 23.00 वाजता पार पडणार आहे. 14 जुलै रोजी चांद्रयान-3 लाँच करण्यात आले होते. तेव्हापासून या यानाने चंद्राच्या अंतराच्या दोन तृतीयांश अंतर पूर्ण केलं आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत पोहोचताच पहिला संदेश पाठवला आहे. हा संदेश असा आहे की, “मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स (MOX), ISTRAC, बंगळुरू. हे चांद्रयान-3 आहे. मला चंद्र गुरुत्वाकर्षण जाणवत आहे.” चांद्रयान-3 चं 14 जुलै रोजी श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून यशस्वीरत्या प्रक्षेपण पार पडलं. 1 ऑगस्ट रोजी चांद्रयानाला पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत जाण्यासाठी प्रवास सुरु केला. यानंतर आता चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत पोहोचलं आहे. चांद्रयान-3 ला ट्रान्सलुनर ऑर्बिट'मध्ये ठेवण्यात आलं आहे. इस्रोने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चे चंद्रावर उतरेल. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 'सॉफ्ट लँडिंग' करण्याचा प्रयत्न करेल.