प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये बिसफेनोल ए (BPA) हे एक रसायन असतं. हे पाण्यासोबत मिसळून शरीरात गेल्यास हानीकारक ठरू शकतं.

प्लॅस्टिकच्या बाटलीत जास्त दिवस पाणी ठेवल्यास त्याची चव बदलते.

पाण्याची प्लॅस्टिक बाटली जर उन्हात ठेवल्यास आणि ते पाणी प्यायल्यास शरीराला घातक ठरू शकतं.

कारण सूर्यकिरणांमुळे BPA रसायन पाण्यात तातडीने मिसळलं जातं.

प्लॅस्टिकची बाटली योग्यप्रकारे न धुतल्यास त्यामध्ये जीवाणूंची पैदास होऊ शकते.

प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिल्याने आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर (Immune System) वाईट परिणाम होतो.

प्लास्टिकच्या बाटलीतून बाहेर पडणारे रसायन पचत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या शरीराच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीवर होतो.

प्लास्टिकमध्ये फॅलेट नावाचे रसायन असते, त्यामुळे प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने यकृताचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो

पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या (Sperm Count) कमी होऊ शकते. याचा थेट त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.

प्लॅस्टिकमध्ये आढळणारी रसायने जसे की शिसे, कॅडमियम, अपंगत्व, रोगप्रतिकारक शक्तीमध्ये अडथळा येणे यांसारखे गंभीर आजार निर्माण करतात.