चणे खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगर नियत्रिंत राहण्यास मदत करतात.

गर्भारपणात स्त्रियांना उलट्यांचा त्रास होतो. याचा परिणाम बाळावरही होतो. यावेळी महिलांना भाजलेल्या चण्याचे सत्व फायदेशीर ठरते.

चण्यामध्ये दूध आणि दह्यामध्ये जितके कॅल्शियम असते तितके आढळते. दररोज चणे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.

चणे खाल्ल्याने पोट भरलेले राहते. तसेच यात कॅलरीज कमी असल्याने वजनही कंट्रोलमध्ये राहते

चणे खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होईल. यामुळे साहजिकच रोगप्रतिकारक क्षमताही वाढेल.

भाजलेल्या चण्यांचा दररोजच्या आहारात समावेश केला पाहिजे. यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.

अशक्तपणामुळे अनेकदा महिलांना कंबरदुखीचा त्रास होतो. अशात महिलांनी दररोज दोन मूठ चणे खाल्ल्यास फायदा होतो.

उर्जेच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आपण आपल्या आहारात भाजलेल्या चण्याचा समावेश करा.

ज्यांना बद्धकोष्ठताची समस्या आहे, त्यांना दररोज चणे खाल्याने फायदा होतो.

भाजलेले चणे खाल्ल्याने मुत्रसंबंधी समस्या दूर होतात.