यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक दिग्गज फलंदाजानी अत्यंत खराब कामगिरी केली. यात रोहित शर्माचंही नाव आहे.



रोहितने 14 सामन्यातील 14 डावात 19.14 च्या सरासरीने आणि 120.17 च्या स्ट्राईक रेटने केवळ 268 रन केले.



मुंबई इंडियन्सच्या सुमार कामगिरीला जबाबदार असणारा आणखी एक खेळाडू म्हणजे संघाचा स्टार ऑलराऊंडर केईरॉन पोलार्ड.



पोलार्डने आयपीएल 2022 मध्ये 11 सामन्यात 14.40 च्या सरासरीने आणि 107.46 च्या स्ट्राईक रेटने 144 रन केले.



दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असणाऱ्या ऋषभ पंतने यंदाच्या हंगामात अत्यंत सुमार कामगिरी केली.



14 सामन्यातील 13 डावांत त्याने 30.91 च्या सरासरीने आणि 151.78 च्या स्ट्राईक रेटने 340 रन केले.



हंगामाच्या सुरुवातीला चेन्नईचा कर्णधार म्हणून मैदानात उतरलेल्या जाडेजाने खास कामगिरी केली नाही.



जाडेजाने 10 सामन्यांत 19.33 च्या सरासरीने आणि 118.36 च्या स्ट्राईक रेटने 116 रन केले.



गुजरात टायटन्सचा फिनिशर राहुल गुजरातकडून खास कामगिरी करु शकला नाही.



आयपीएल 2022 मध्ये त्याने 14 सामन्यातील 12 डावांत 31.00 च्या सरासरीने आणि 147.61 च्या स्ट्राईक रेटने 217 रन केले.