हार्दिक आणि अक्षय यांनी २ डिसेंबर २०२२ रोजी लग्नगाठ बांधली मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी आहे गेल्या महिन्यात अक्षया आणि हार्दिकने लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. १५ जानेवारी रोजी अक्षया आणि हार्दिकने लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत थाटात साजरी केली. मकरसंक्रांतसाठी अक्षयाने काळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. काळ्या साडीवर अक्षयाने हिरव्या रंगाचा आरी वर्क केलेला डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे. हार्दिकने मकरसंक्रांतसाठी काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. हलव्याच्या दागिन्यांमध्ये अक्षया आणि हार्दिकचं सौंदर्य खुललं आहे. आमची पहिली मकरसंक्रांती #अहा’ असे कॅप्शन अक्षयाने या फोटोंना दिले आहे.