प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटेचा आज 37 वा वाढदिवस आहे. राधिका तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. राधिका आपटेचा जन्म 7 सप्टेंबर 1985 रोजी झाला. राधिका आपटेने हिंदी, तमिळ, तेलगू, बंगाली, मराठी आणि इंग्रजी भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'वाह लाइफ हो तो ऐसी' या चित्रपटातून राधिकानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. राधिकानं चित्रपटांसोबतच वेब सीरिजमध्ये देखील काम केलं. 'रक्त चरित्र', 'रक्त चरित्र 2', 'शोर इन द सिटी', 'बदलापूर', 'हंटर' आणि पॅडमॅन या चित्रपटांमध्ये राधिकानं काम केलं. Ghoul, Sacred Games या वेब सीरिजमध्ये राधिकानं काम केलं आहे. राधिका तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. राधिकाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.