बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी गरोदरपणातही चित्रपटाचं शूटिंग केलं. अशा परिस्थितीत त्यांना मोठा त्रासही सहन करावा लागला. पाहा या अभिनेत्रींची संपूर्ण यादी.
'देवदास' चित्रपटादरम्यान माधुरी दीक्षित गर्भवती होती. असं असतानाही तिनं चित्रपटातील गाण्यासाठी शूट केलं.
काजल अग्रवालला गरोदरपणामुळे नागार्जुन स्टारर 'द घोस्ट'मधून बाहेर पडावं लागलं. मात्र काजलनं याबद्दल कधीही काहीही सांगितलं नाही.
अभिनेत्री काजोल तिच्या 'वुई आर द फॅमिली' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गरोदर होती. मात्र, तिनं तिच्या चित्रपटाचं शूटिंग गरोदरपणातच पूर्ण केलं.
'ओम शांती ओम' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान फराह खानही गरोदर होती. नंतर तिनं तीन मुलांना जन्म दिला.
ऐश्वर्या राय बच्चन देखील तिच्या एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान प्रेग्नंट होती, त्यामुळे तिला मध्येच चित्रपट सोडावा लागला होता.
'जुदाई' या चित्रपटाच्या वेळी श्रीदेवी गर्भवती होती. यावेळी श्रीदेवी जान्हवी कपूरला जन्म देणार होती. त्यावेळी अभिनेत्रीचं लग्नही झालं नव्हतं. चित्रपटाच्या शूटिंगनंतर श्रीदेवीनं बोनी कपूरसोबत लग्न केलं.
'शोले' चित्रपटादरम्यान जया बच्चन गरोदर होत्या. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बेबी बंप दिसू नये म्हणून त्यांनी पांढऱ्या रंगाच्या साडी नेसली होती
'झंकार बीट्स'च्या शूटिंगदरम्यान जुही चावला गरोदर राहिली. मात्र अभिनेत्रीने तिच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलं
'रझिया सुलतान' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हेमा मालीनीही गर्भवती होती
अभिनेत्री करीना कपूर खान चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोनदा गर्भवती झाली होती. 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटादरम्यान ती पहिल्यांदा प्रेग्नंट झाली होती, त्यानंतर काही काळानंतर चित्रपटाचं शूटिंग पुन्हा झालं. त्यानंतर 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटादरम्यानही ती गरोदर होती.