मानुषी छिल्लर ही भारतीय मॉडेल आहे.

2017 च्या मिस वर्ल्ड या जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धेची मानुषी छिल्लर विजेती आहे.

मिस वर्ल्ड' हा किताब जिंकणारी मानुषी ही सहावी भारतीय महिला आहे.

मानुषीने केवळ तिच्या राज्याचेच नाही तर संपूर्ण भारताचे नाव उंचावले आहे.

मानुषी छिल्लर मॉडेल असण्यासोबतच कुचीपुडी नृत्याची प्रशिक्षित नृत्यांगना आहे.

मानुषीला अभिनयाचीदेखील आवड आहे.

मानुषी छिल्लरने 'पृथ्वीराज' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

मानुषीला पॅराग्लाइडिंग, बंजी जंपिंग, स्कूबा डायविंग सारखे खेळ आवडतात.

मानुषी समाजसेवा करणाऱ्या अनेक संस्थांसोबत कामही करते.

मानुषी छिल्लर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.