हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये माधुरी दीक्षित आघाडीवर आहे.
माधुरीने सौंदर्य, नृत्य आणि अभिनय या तिन्ही गोष्टींवर प्रभुत्व मिळवले आहे.
माधुरीला लहानपणीच नृत्याची गोडी लागली. तिने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून कथ्थक शिकायला सुरुवात केली.
माधुरीने 1984 साली 'अबोध' या सिनेमाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.
माधुरीला 'तेजाब' या सिनेमामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली.
माधुरीचे 'राम लखन', 'परिंदा', 'त्रिवेद', 'क्रिशन कन्हय्या' आणि 'प्रहार' असे अनेक सिनेमे गाजले आहेत.
'साजन', 'बेटा', 'खलनायक', 'हम आपके है कौन', 'राजा' अशा अनेक सुपरहिट सिनेमांत माधुरीने काम केलं आहे.
माधुरीचा 'मजा मा' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
माधुरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
माधुरी दीक्षितच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.