प्रहार : द फायनल अटॅक

'प्रहार : द फायनल अटॅक' हा सिनेमा 1991 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा नाना पाटेकर यांनी सांभाळली होती.

परिंदा

'परिंदा' हा सिनेमा 1989 साली खूप गाजला होता. या सिनेमात जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, अनुपम खेर अशी तगडी स्टारकास्ट होती.

देवदास

'देवदास' हा सिनेमा 2002 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. संजय लीला भन्साळी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

हम आपके है कौन

'हम आपके है कौन' हा सिनेमा 1994 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सूरज बडजात्या दिग्दर्शित हा सिनेमा खूप गाजला.

धारावी

माधुरी दीक्षितचा 'धारावी' हा सिनेमा आयएमडीबी रेटिंगमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. आयएमडीबी रेटिंगमध्ये या सिनेमाला 7.3 रेटिंग मिळाले आहे.

साजन

'साजन' हा सिनेमा बॉलिवूडमधील सुपरहिट सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमात माधुरी दीक्षित आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत होते.

खलनायक

'खलनायक' हा सिनेमा 1993 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सुभाष घईने या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात संजय दत्त, माधुरी दीक्षित व जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत होते.

मृत्युदंड

माधुरी दीक्षितचा 'मृत्युदंड' हा सिनेमा आयएमडीबीच्या शर्यतीत आठव्या क्रमांकावर आहे. या सिनेमाला 7.1 रेटिंग मिळाले आहे.

दिल तो पागल है

'दिल तो पागल है' हा सिनेमा 1997 साली प्रदर्शित झाला होता. यश चोप्राने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.

डेढ इश्किया

माधुरी दीक्षितचा 'डेढ इश्किया' हा सिनेमा आयएमडीबीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या सिनेमाला 7 रेटिंग मिळाले आहे.