नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेता 'गोविंदा'चा आज वाढदिवस आहे. गोविंदाने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. गोविंदाने हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गोविंदाचा जन्म 21 डिसेंबर 1963 साली एका पंजाबी कुटुंबात झाला. गोविंदा आज एक यशस्वी अभिनेता असला तरी करिअरच्या सुरुवातीला त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. गोविंदाने 'इल्जाम' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. गोविंदाने अभिनय आणि नृत्याने जगभरातील चाहत्यांना वेड लावलं. गोविंदा एका सिनेमासाठी दोन ते तीन कोटींचं मानधन घेतो. जाहिरातींमधूनदेखील तो चांगलीच कमाई करतो. गोविंदाची वर्षाची कमाई 10 ते 12 कोटी आहे. गोविंदा 170 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. आज गोविंदा 'हिरो नं. 1' म्हणून ओळखला जातो.