अभिनेत्री हंसिका मोटवानी अभिनयासह तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. हंसिकाने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हंसिका मल्टीकलर लेहेंग्यामध्ये दिसत आहे. हंसिकाने बेसिक मेकअप आणि पोनी हेअरस्टाईलसह हा लूक पूर्ण केला आहे. या लेहेंग्यासोबत हंसिकाने सिल्व्हर इअररिंग्स आणि बांगड्या घातल्या आहेत. या लूकमध्ये हंसिका अतिशय सुंदर दिसत आहे. हंसिका ट्रेडिशनल आणि वेस्टन अशा प्रत्येक अंदाजात तितकीच सुंदर दिसते. हंसिका दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. हंसिका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते. आपल्या सौंदर्याने कोट्यवधींच्या हृदयाची धडकन बनलेल्या हंसिका मोटवानीने अभिनयातही आपली वेगळी छाप उमटवली आहे.