अभिनेत्री हंसिका मोटवानीचा नुकताच विवाह झालाय. लग्नानंतर हंसिका पहिल्यांदाच पतीसोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे. पारंपरिक लूकमध्ये हिसिंका खूपच सुंदर दिसत होती. हंसिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया मंगळवारी मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. लग्नानंतर दोघे पहिल्यांदाच स्पॉप झाले. गळ्यात मंगळसूत्र, सिंदूर आणि हातात बांगड्या घातलेल्या गुलाबी सूटमध्ये हंसिका मोटवानी विमानतळावर खूपच सुंदर दिसत होती. गोंडस स्माईल आणि हातावर आणि पायावर लावलेली मेंदी तिचे सौंदर्य आणखीनच वाढवत आहे. सोहेलही यावेळी एथनिक लूकमध्ये दिसला. त्याने फिकट गुलाबी रंगाचा कुर्ता घातला होता.