'इमली' फेम अभिनेत्री हेतल यादवचा अपघात झाला आहे. 'इमली' या मालिकेत हेतल शिवानी राणा हे पात्र साकारत आहे. हेतल रविवारी रात्री शूटिंगवरून घरी परतत असताना तिच्या कारला ट्रकने धडक दिली. हेतल स्वत: ड्राईव्ह करत असताना हा अपघात झाला आहे. हेतलचा अपघात झाल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अपघातात हेतलला कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत झालेली नाही. अपघातातून वाचल्याबद्दल हेतलने देवाचे आभार मानले आहेत. हेतलने छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतदेखील काम केलं आहे. हेतल अपघातात जखमी झालेली नसल्याने तिच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. हेतल लवकरात-लवकर या धक्क्यातून बाहेर यावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.