काही मुलींना लांब केस ठेवण्याची इच्छा असते, त्यांनी नियमित केसांना तेल लावा, केस लांब आणि मजबूत होतात.

तुमचे केस कडक होत असतील, तर रोज तेल लावत जा.

नियमित तेल लावल्यामुळे केस पांढरे होत नाहीत.

दररोज तेल लावल्याने तुमच्या टाळूमध्ये रक्त प्रवाह वाढवतो, केस मजबूत होतात.

तेलांमध्ये फॅटी अ‍ॅसिड असतात जे केसांना नैसर्गिक चमक देण्यास मदत करतात.

केसांना तेल लावल्यामुळे कोंडा आणि उवा या केसांच्या समस्या होत नाही.

गरम तेलाच्या मसाजमुळे तुमच्या टाळूचे पोषण होऊ शकते आणि कोणताही संसर्ग टाळण्यास मदत होते.

दररोज तेल मालिश केल्यामुळे केसांची वाढ झचपट होते.

तेल मालिश केल्याने टाळू आणि केसांचे आरोग्य मोठ्या प्रमाणात सुधारू शकते, ज्यामुळे केस गळणे कमी होते.

ऑइल मसाज केसांच्या पट्ट्यांसाठी संरक्षणात्मक थर तयार करण्यास मदत करू शकते. जेणेकरुन केसांना प्रतिकारशक्ती निर्माण होईल.