व्यस्त जीनवशैलीमुळे आपण चुकीच्या सवयीच्या आहारी जातो याचा परिणाम आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर होतो.



परिणामी अनेक समस्या उद्भवतात. त्यातीलच एक समस्या म्हणजे केस गळती. सध्या बहुतेक जण केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त आहे.



केसासाठी बाजारात अनेक प्रोडक्टस उपलब्ध आहेत. पण या महागड्या आणि केमिकलयुक्त प्रोडक्टसपेक्षा तुम्ही घरगुती उपाय करुन ही समस्या दूर करु शकता.



तुम्हीही या समस्येपासून त्रस्त असाल, तर यावर तुम्हाला सोपा आणि स्वस्त घरगुती उपाय जाणून घ्या.



केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्याचा सोपा घरगुती उपाय म्हणजे लसूण.



प्रत्येक घराच्या स्वयंपाक घरात लसूण सहज उपलब्ध असते. लसूण आरोग्यासाठी लाभदायक आहे. त्याचप्रमाणे लसूण त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहे.



लसणामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, सेलेनियम आणि मॅंगनीज सारखे पोषक घटक पुरेशा प्रमाणात असतात. यामुळे केस लांब, जाड आणि मजबूत मदत होते.



केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लसूण हा सोपा आणि रामबाण उपाय आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.



लसणामध्ये सेलेनियम आणि सल्फर आढळते, हे केसांच्या मजबुतीसाठी फार आवश्यक असते. त्यामुळे केसांना लसणाचा रस लावल्याने केस मजबूत होतात.



केसांच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर केसांमध्ये लसणाचा रस वापरणे खूप उपयुक्त ठरु शकते.



जर तुम्ही केस गळतीमुळे त्रस्त असाल तरीही तुम्ही केसांना लसणाचा रस लावून पाहा, तुमची समस्या नक्की दूर होईल.



लसणाच्या वापरामुळे केसगळतीपासून सुटका मिळेल. लसणामधील गुणधर्म केसगळती रोखण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.