सध्याच्या काळात सगळेच जण फिट राहण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी डाएटिंग, वर्कआउटचा पर्याय अवलंबला जातो.



डाएटिंग आणि वेट लॉसनंतरही अनेकांना मनसारखा परिणाम जाणवत नाही.



काही लोकांचे वजन अल्पवधीतच पुन्हा वाढू लागते.



तुम्हीदेखील वाढत्या वजनाने त्रासलेले असाल तर या काही पर्यायांचा अवलंब करू शकता.



या पर्यायाच्या माध्यमातून वजन कमी करता येईल.



सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यावे. त्यामुळे शरीर डिटॉक्सिफाय होईल. त्यामुळे वेटलॉस करण्यात मदत होईल.



वजन कमी करायचे असेल तर सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी.



यामुळे तुम्ही दिवसभर अॅक्टिव्ह राहाल आणि वॉक अथवा वर्कआउटसाठीदेखील वेळ मिळेल.



वजन कमी करण्यासाठी सकाळी ब्रेकफास्ट नक्की करावा. मात्र, त्यात पौष्टिक पदार्थांचा समावेश असावा.



सकाळच्या कोवळ्या उन्हामुळे व्हिटॅमिन डी, सेरोटोनिन आणि टेस्टोस्टेरोनची पातळी वाढवतात.



त्यामुळे मेटाबॉलिझम अधिक सक्रिय होते आणि शरीरातील कॅलरीज बर्न होतात.



स्लिम ट्रिम होण्यासाठी दररोजच्या डाएटमध्ये चहा-कॉफी ऐवजी ब्लॅक कॉफी, ग्रीन टी चा समावेश करा