कुरळे केस अधिक रुक्ष आणि कोरडे असतात. त्यामुळे कुरळ्या केसांची अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. कुरळ्या केसांना पोषण मिळण्यासाठी दर आठवड्यातून किमान दोन वेळ तेल मॉलिश करणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही खोबरेल तेल, बदाम तेल, राईचं तेल, एरंडेल तेल अशा कोणत्याही तुमच्या आवडत्या तेलाने मॉलिश करु शकता. पण तेल लावताने तेल नेहमी डबल बॉयलरमध्ये कोमट करुन नंतरच त्यानं तेल मॉलिश करा. याव्यतिरिक्त तुम्ही आठवड्यातून किमान एक वेळा हेअर मास्क वापरून केसांना योग्य पोषण देत मॉश्चराईज करु शकता. केसांसाठी कोथिंबीर फार लाभदायक ठरते. कोथिंबीर केसांना पोषण देण्यासोबतच तुमच्या केसांना चमकदार बनवण्यात मदत करते. मेथी केसांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. मेथी हेअर मास्कचा वापर केल्यास तुमची केस गळतीपासून सुटका होईल. केळ्याचा वापर केल्यास केस अगदी चमकदार आणि मुलायम बनतील. मेहंदी केसांसाठी खूप फायदेशीर आहे. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.