कॉमनवेल्थ बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली.



या स्पर्धेत पीव्ही सिंधूनं मिशेल लीविरुद्ध 21-15, 21-13 असा विजय मिळवत भारताच्या झोळीत आणखी एक सुवर्णपदक घातलंय.



कॉमनवेल्थ स्पर्धेतील हे भारताचं 19 वं सुवर्णपदक आहे. तर,



भारतानं आतापर्यंत या स्पर्धेत एकूण 56 पदकं जिंकली आहेत.



ज्यात 15 रौप्यपदक आणि 22 कांस्यपदकांचा समावेश आहे.



कॉमनवेल्थ बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच पीव्ही सिंधूनं आक्रमक खेळी दाखवली.



पहिल्या सेटमध्ये पीव्ही सिंधूनं 21-15 असा विजय मिळवत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली.



त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही पीव्ही सिंधूनं मिशेल लीला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही.



दुसरा सेटही पीव्ही सिंधूनं 21-13 च्या फरकानं जिंकून सामन्यात एकतर्फी विजय मिळवला.



(Photo Credit:@pvsindhu1/IG)