विदर्भ आणि मराठवाड्यात पावसासह गारपिटीचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला होता, त्यानुसार पावसाने हजेरी लावलीच आहे.



अकोला, अहमदनगर, भंडारा आणि यवतमाळ याठिकाणी तर गारपिटीसह पावसाला सुरुवात झाली.



अकोल्यात मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. अकोला ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी गारपिट देखील झाली.



अकोल्यात दुपारनंतर अचानक वातावरणात बदल आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.



अकोल्यासह अहमदनगर जिल्ह्यातही गारांचा पाऊस पडलेलं पाहायला मिळालं. यावेळी श्रीरामपूर, नेवासा तालुक्यात जोरदार गारपीट झाली.



यानंतर भंडारा, यवतमाळ आणि गोंदीया याठिकाणीही पावसाने हजेरी लावली.



हवामान खात्याने नव्या वर्षात पुन्हा हुडहूडीची शक्यता वर्तवली असून विदर्भातील किमान तापमान 10 ते 15 अंशसेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.



अचानक पडलेल्या गारपीट आणि पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.



पावसामुळे रब्बीतील हरभरा, गहू आणि तूर पिकांचं नुकसान देखील झाले आहे.